बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली असून, आता जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींची संख्या ८७५ झाली आहे. शासन राजपत्रात यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंतनगर, आणि मेहकर तालुक्यातल्या ग्रामपंचायत विश्विचं विभाजन करून राजगड इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण निकषांअंतर्गत लोणार तालुक्यातल्या पारडाचं विभाजन करून धायफळ, जळगाव जामोद तालुक्यातल्या रसूलपूरचं विभाजन करून वायाळ, तसंच सुनगावचं विभाजन करून चालठाणा खुर्द इथं नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत.