डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 26, 2024 3:20 PM | Puja Khedkar | UPSC

printer

पूजा खेडकर यांना दिलासा कायम, सुनावणी पुढे ढकलली

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएसएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे. खेडकरांच्‍या वकिलांनी तपशीलवार म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितला आहे.  आता या प्रकरणाची सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार असून, तोपर्यंत पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम असेल. खेडकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा आरोप आहे. सध्या त्या हंगामी जामिनावर आहेत. पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला युपीएससीने विरोध केला आहे.