डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘विश्वसनीयता’ ही आकाशवाणीची ओळख – डॉ. प्रज्ञा पालीवाल

 

‘आकाशवाणी जनहित राखण्यासाठी तसंच माहिती-शिक्षण आणि मनोरंजन देण्यासाठी वचनबद्ध असून ‘विश्वसनीयता’ ही आकाशवाणीची ओळख आहे’ असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी म्हटलं आहे. रेडिओ आणि श्राव्य कार्यक्रम निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माध्यमांना काल रात्री मुंबईत झालेल्या एका समारंभात गौरवण्यात आलं त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गौर बोलत होत्या. 

 

आकाशवाणीनं ‘इंडिया ऑडिओ समीट अँड अवॉर्ड्स – २०२५’ अंतर्गत विविध प्रकारात एकूण सहा पुरस्कार पटकावले आहेत. ‘नई सोच नई कहानी- अ रेडियो जर्नी विथ स्मृति ईरानी’ या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाला ‘सीरीज़ ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. १३ भागांच्या या मालिकेमध्ये धैर्यवान महिलांच्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. 

 

वृत्तविभागाच्या ‘फोन-इन कार्यक्रम पब्लिक स्पीक’ या कार्यक्रमाला आरोग्य आणि सुदृढता या प्रकारात ‘सर्वश्रेष्ठ श्राव्य कार्यक्रम’ या प्रकारात पुरस्कार मिळाला आहे. ‘छायागीत’ या कार्यक्रमाला ‘सर्वश्रेष्‍ठ लेट नाईट शो’ चा तसंच ‘उजाले उनकी यादों के’ या कार्यक्रमाला ‘बेस्ट सेलेब्रिटी शो ऑन एयर’ हा पुरस्कार तर  ‘सफरकास्ट’ या कार्यक्रमाला ‘बेस्ट ट्रैवल शो’ चा  पुरस्कार मिळाला आहे.

 

तसंच  लघु-स्वरूपातल्या ऑडिओ कंटेंटमध्ये सर्जनशील उत्कृष्टता दाखवत ‘सर्वोत्कृष्ट इंटरस्टिशियलचा पुरस्कार’ देखील आकाशवाणीनं पटकावला आहे. ‘आकाशवाणी  एक प्रकाश स्तंभासारखं कार्यरत आहे’, असंही महासंचालकांनी यावेळी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा