यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु

यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमधे आजपासून नोंदणी सुरु झाली. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या संकेतस्थळावरुन नोंदणीला कालच सुरुवात झाली. देशभरातल्या निवडक ५४० बँकशाखांमधेही यात्रेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात्रेसाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे. सर्व यात्रेकरुंना तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र, आणि इतर कागदपत्रं सादर करावी लागतील. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन कार्ड बाळगणं बंधनकारक आहे. प्रतिदिन केवळ १५ हजार यात्रेकरुंना परवानगी असेल. अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गे आणि गंदेरबाल जिल्ह्यातल्या बालताल मार्गावरुन यात्रा येत्या ३ जुलै पासून सुरु होईल. ५२ दिवसचालणारी ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवशी येत्या ९ ऑगस्टला समाप्त होईल. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गेल्या ५ मार्चला यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.