HIV-AIDS विषयी जनजागृतीसाठी रेड रन मॅरेथॉनचं आयोजन

एचआयव्ही-एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आज रेड रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनची यंदाची संकल्पना रन टू एंड एड्स ही होती. एचआयव्ही – एड्सबाबत जनजागृती करणं तसंच एचआयव्हीने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुक्त संवाद, शिक्षण आणि समर्थन या भावनेला प्रोत्साहित करणं, हे जनजागृती कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने केलं आहे.