इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून पंढरपूरच्या आरोग्य शिबिराची नोंद

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झालेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराचा लाभ यंदा आषाढी वारी करणाऱ्या १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला. त्यामुळे या आरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समधे झाली आहे. या शिबिराची संकल्पना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची आहे. आषाढी वारीच्या पालखी मार्गांवर तसंच पंढरपूर इथे या शिबिराचं आयोजन केलं गेलं. या शिबिरात साडे सात हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.