August 3, 2024 12:19 PM | ITR

printer

३१ जुलैपर्यंत ७ कोटी २८ लाख आयकर विवरणपत्र दाखल

मूल्याकंन वर्ष २०२४- २५ साठी ३१ जुलैपर्यंत विक्रमी ७ कोटी २८ लाख जणांनी आयकर विवरणपत्र दाखल केल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संख्या साडे सात टक्क्यांनी अधिक असल्याचं मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यंदा विवरणपत्र दाखल करणाऱ्यांपैकी सुमारे ५ कोटी २७ लाख जणांनी नव्या करप्रणालीनुसार, तर २ कोटी १ लाख जणांनी जुन्या करप्रणालीनुसार विवरणपत्र दाखल केलं आहे.