June 9, 2025 8:20 PM

printer

चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणीचा फौजदारी गुन्हा रद्द करावा यासाठी RCB ची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजयोत्सवाच्या वेळी चेंगराचेंगरीमुळे काहीजणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करावा यासाठी RCB, अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

 

कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना, आणि इतरांशी तपशीलवार चर्चा केल्यानंतरच विजय मिरवणूक आणि उत्सवाची घोषणा आम्ही केली होती, मात्र विजय मिरवणुकीसाठीची परवानगी मागं घेतल्याची माहिती ४ जूनच्या सकाळी पोलिसांनी तोंडी दिली, त्याच सुमाराला RCBचा विधान सौंधात सत्कार करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ आमच्या खेळाडू आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर तमाम जनतेलाही आमंत्रित केलं होतं, असं RCB आणि त्यांच्या मुख्य परिचलन अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.  

दरम्यान या प्रकरणी निलंबित केलेले भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी विकाश कुमार यांनी त्यांच्या निलंबन आदेशाला CAT अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान दिलं आहे. कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह पाच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कर्नाटक सरकारनं निलंबिक केलं आहे. 

 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.