November 7, 2024 10:48 AM | KYC | RBI

printer

केवायसीबाबत काही नियम बदलण्याची RBIची घोषणा

रिझर्व्ह बँकेनं ग्राहकाची ओळख पटवण्याच्या म्हणजे केवायसीबाबत काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे.

 

नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन किंवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी कस्टमर ड्यू डिलिजन्स म्हणजे सीडीडीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल.

 

बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणीकेंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.