RBI चे सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेनं सात दिवसांच्या व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलावाचे निकाल आज जाहीर केले. या लिलावासाठी आरक्षित एक लाख कोटी रुपयांच्या रकमेपैकी ८४ हजार ९शे ७५ कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि ही संपूर्ण रक्कम रिझर्व्ह बँकेनं स्वीकारली. व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो लिलाव हा बाजारपेठेतली अतिरिक्त रोख काढून घेण्याचा एक मार्ग आहे. बाजारपेठेतल्या व्याजदरांनुसार हे लिलाव घेतले जातात.