August 4, 2025 8:19 PM | RBI

printer

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरु

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय स्टेट बँकेनं वर्तवली आहे. मात्र सलग तीन वेळा व्याज दर कमी केल्यामुळे आता रिझर्व्ह बँक व्याज दरात बदल करणार नाही, असं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.