रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दहा वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर सात पूर्णांक एक दशांश टक्के, तर सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के इतका राहणार आहे.