रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर लादलेले निर्बंध हटवले

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर गेल्यावर्षी लादलेले निर्बंध हटवले आहेत. नवीन ग्राहक स्वीकारणे, नवे क्रेडिट कार्ड देणे यासारख्या गोष्टींवर हे निर्बंध होते. मात्र सर्व नियामकीय पूर्तता पूर्ण केल्यामुळे आणि आवश्यक उपाययोजना केल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध हटवले.