डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये ए प्लस रेटिंग

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा ए प्लस रेटिंग मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं.

आरबीआयनं एक्स समाज माध्यमावरील पोस्टवर प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा हा सन्मान मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयला स्थिरता मिळाली असून आर्थिक विकासाला योग्य दिशा मिळाल्याचंही प्रधानमंत्र्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.