RBI आणि BOM मधे सामंजस्य करार

भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशिअस यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या व्यवहारांत स्थानिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. द्विपक्षीय व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि मॉरिशियन रुपया वापरण्यासाठीचा आराखडा या कराराअंतर्गत तयार केला जाईल. याद्वारे दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध अधिक दृढ होतील, तसंच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांनाही चालना मिळेल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.