डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 23, 2025 7:02 PM | RBI

printer

रिझर्व बँककडून यावर्षासाठी केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं केंद्रसरकारला २ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर केला आहे. बँकेच्या संचालकमंडळाची ६१६वी बैठक  आज मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षते खाली झाली. त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर झाला. 

 

संचालक मंडळाने गेल्या १५ मे रोजी संमत केलेल्या सुधारित आर्थिक भांडवली निकषांनुसार ही रक्कम ठरवली असून त्यात अवलंबित जोखीम रक्षक कंटिंजंट रिस्क बफर साडेसात ते साडेचार टक्के पर्यंत  ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.