December 31, 2024 7:41 PM

printer

मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे

रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हे निर्बंध हटवल्याचं रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.