अमेरिकेनं लादलेलं ५० टक्के आयात शुल्क ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब नसल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-जागतिक बँकच्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत ते बोलत होते.
स्थानिक पातळीवर असलेल्या मागणीमुळं अमेरिकेनं लादलेल्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम कमी होतो, असं त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचलं आहे. त्यांच्याशीही मल्होत्रा यांनी चर्चा केली.