झिरो बॅलन्स असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.
पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसुविधा, बँकिग क्षेत्र मजबूत करणे, कर्ज पुरवठा वाढवणे, व्यवसाय सुलभता, परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण याला चालना देण्यासाठी त्यांनी २२ सुधारणा जाहीर केल्या.