रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची ३ दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी १० वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील. सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ञांचं मत आहे. जून महिन्यात बँकेनं रेपो दर अर्धा टक्क्यानं कमी केला होता मात्र ऑगस्ट महिन्यात रेपो दरात काहीही बदल केला नव्हता.
Site Admin | September 29, 2025 3:19 PM | RBI
RBIच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू
