April 4, 2025 10:49 AM | RBI

printer

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती

डॉक्टर पूनम गुप्ता यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी १ एप्रिल रोजी रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारला. या पदावर त्यांची तीन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे.