September 4, 2024 7:18 PM

printer

कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरणाचं रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

 

कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं.

 

कोकण रेल्वे मार्गावरच्या १२ स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असून येत्या सहा तारखेला रायगडमधल्या दोन स्थानकांचंही लोकार्पण होणार असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. तर, कोल्हापूर आणि वैभववाडीला जोडणारा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आपण अलीकडेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली असल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.