डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपा उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार

भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार असल्याचं आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यानिमित्त एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती त्यांनी दिली. या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमधून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

दरम्यान, वसई परिसरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीच्या सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी आज आपल्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.