काँग्रेस मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा भाजपचा आरोप

महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा आरोप, भाजपानं केलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना हा आरोप केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले पक्ष संकोचित मनोवृत्तीचे असून, अल्पसंख्यकांच्या उन्नतीला देखील त्यांचा विरोध आहे,  असं ते म्हणाले.