रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवू लागल्यानं जिल्ह्यात सर्वप्रथम रत्नागिरी तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरालगतच्या २५ वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं जात आहे. चिपळूण तालुक्यातल्या १४ गावांनी तर राजापूर आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रत्येकी दोन गावांनी टँकरची मागणी केली आहे. रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातला पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरण्याचा अंदाज असल्यानं पालिकेनं हे नियोजन केलं आहे.
Site Admin | April 9, 2025 7:25 PM | Ratnagiri | Water Supply
रत्नागिरीत टँकरनं पाणीपुरवठा
