December 29, 2024 7:26 PM

printer

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात  असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
समुद्रकिनारी मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी भाट्ये किनारा, आरे-वारे किनारा या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या आहेत. समुद्रकिनारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

 

नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. काळाराम मंदिरासह सीता गुंफा, त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, तसंच वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरांत भाविकांची गर्दी झाली आहे. त्र्यंबकेश्वर इथं भाविकांची गर्दी प्रचंड वाढल्यानं व्हीआयपी दर्शन बंद केलं आहे. वणी इथं नवीन वर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुले ठेवलं जाणार आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.