डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ऑनलाइन फसवणुकी प्रकरणी आरोपीला चंदीगढमधून अटक

ऑनलाइन फसवणुकीच्या एका प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी आरोपीला चंदिगढ मधून अटक केली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आणि वैयक्तिक संदेश पाठवून, गुंतवणुकीवर जास्त रकमेचा परतावा देण्याचं आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या एका व्यक्तीची तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.