November 25, 2025 7:09 PM | Ratnagiriv Police

printer

नागरिकांच्या तक्रारींसाठी रत्नागिरी पोलिसांचा नवा उपक्रम

नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता याव्यात, समस्या मांडता याव्यात किंवा माहिती पाठवता यावी यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता आधुनिक तंत्राची मदत घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नसेतू नावाचा स्मार्ट एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू करण्यात आला असून, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. ९३७-१४१-५६१२ या क्रमांकावर ही सेवा उपलब्ध होईल. तसंच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, तसंच आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सोशल मीडिया लॅब सुरू केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.