रत्नागिरीत मिलन वृद्धाश्रमाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या टाकेडे गावात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिलन’ या  वृद्धाश्रमाचं उद्घाटन झालं.  पूर्वी कुटुंबव्यवस्था शक्तिशाली असल्यानं आपल्याकडे वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती, मात्र आता काही सामाजिक कारणांमुळे त्यांची गरज भासू लागली आहे, असं त्यांनी सांगितलं.. त्यादृष्टीनं राज्यात पहिल्या पाच वृद्धाश्रमांमध्ये स्थान मिळवू शकणारा प्रकल्प इथे उभा राहिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. भारत हा आज युवा देश म्हणून ओळखला जातो. मात्र २०३५ नंतर देशातल्या वयस्कर व्यक्तींची संख्या वाढत जाणार असून त्यासाठी वयस्कर व्यक्तींच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना याकडे आतापासूनच लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.