डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात गृहमतदानाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमधले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांसाठी आजपासून गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कुवारबाव इथे राहणाऱ्या ९२ वर्षं वयाच्या मतदार जयश्री नाईक यांनी गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य बजावलं. तसंच ८८ वर्षांचे शांताराम देशपांडे यांनीही गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला.

 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व १० विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला आज सुरूवात झाली. वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांची संख्या इथं ४ हजार ६०१ इतकी असून येत्या शनिवारपर्यंत गृहमतदानाची मोहीम चालणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.