रत्नागिरीतल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या बंदरासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साखरीनाटे, रत्नागिरी तालुक्यातलं मिरकरवाडा आणि दापोली तालुक्यातलं हर्णै ही जिल्ह्यातल्या मच्छिमारांना ताकद देणारी बंदरं आहेत, असं प्रतिपादन उदय सामंत यांनी केलं.