स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीतल्या शिवसेनेच्या तीन हजार बूथप्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन केलं. तसंच रत्नागिरीत उभारलेल्या कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं अनावरणही त्यांनी केलं.
शहरातल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात ही शिल्पं उभारली असून, मोडीत काढलेल्या वाहनांच्या सुट्या भागांपासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ती साकारली आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सहा भारतरत्नांची ही शिल्पं आहेत.