आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरीत ६६ गुन्हे दाखल, ५१ आरोपी अटक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल केले असून ५१ आरोपींना अटक केली आहे. यात १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा आणि २७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या मालाचं एकूण मूल्य १ कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी सांगितलं. ४ पथकांद्वारे महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.