रत्नागिरीत १३ बांगलादेशी नागरिकांचं मायदेशी प्रत्यार्पण

रत्नागिरी जिल्ह्यात  बेकायदेशीरपणे  वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांचं शिक्षेनंतर मायदेशी प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या नागरिकांची सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात आलं.

 

भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी  पारपत्र  अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व १३ जणांची  मायदेशी प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आल्याचं रत्नागिरी पोलिसांनी सांगितलं.

 

या तपासात महत्त्वाची कामगिरी करणारे तपास अधिकारी आणि अंमलदारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचं बक्षीसही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जाहीर केलं होतं, अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.