मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार असून, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. चरित्रकार धनंजय कीर यांचं नाव संमेलनस्थळाला देण्यात आलं आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, युवा कवी अनंत राऊत, युवा संशोधक डॉ. प्रतीक मुणगेकर यांच्यासह अनेक मान्यवर या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. दिवसभर विविध परिसंवाद आणि अन्य साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.
Site Admin | November 21, 2025 5:47 PM | Ratnagiri
रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचं २२ नोव्हेंबरला आयोजन