डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 18, 2024 6:57 PM | Ratnagiri

printer

रत्नागिरीत वायुगळतीमुळं बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचं रास्ता रोको आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या  वायुगळतीमुळं बाधित  विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज जयगडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. पालकांनी जयगड सागरी पोलीस ठाण्यात जाऊन जिंदाल कंपनीबद्दल रोष व्यक्त केला, तसंच कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची मागणी केली. संतप्त  पालकांनी कंपनीच्या गाड्या रोखल्या, तसंच प्रवेशद्वारही बंद केलं. या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात‌ राहण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. ही दुर्घटना १२ डिसेंबरला झाली. त्यानंतर  सुमारे ७० विद्यार्थ्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन-तीन दिवसांनी त्यांना सोडून दिलं होतं,  मात्र आता पुन्हा त्रास होऊ लागल्यानं  ३२ विद्यार्थ्यांसह एकूण ३४ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.