रत्नागिरीत काल संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासातला सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात राजापुरात नोंदवला गेला. हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जगबुडी आणि कोदवली या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे मंडळानं दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाने तेरेखोल, कर्ली, गडनदी वाघोटन आणि तिलारी या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कुडाळ शहरात कर्ली नदीचं पाणी शिरलेल्या वस्तीतल्या लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे