डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला प्रारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीला आज प्रारंभ झाला. नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांवरच्या अत्याचारांबद्दल चिंता  व्यक्त केली.  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘तंत्रज्ञानानं  शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित करेल’, असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या पथसंचालनानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह इतर  मान्यवर तसंच संघस्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

राज्यात अनेक ठिकाणी आरएसएस तर्फे विजयादशमीनिमित्त झालेल्या संघ संचलनात स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.