महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर युतीतून बाहेर पडू – महादेव जानकर

महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर युतीतून बाहेर पडून सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवू, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या जानकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. महायुतीकडून ३५ ते ४० जागांची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं.