दूसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस आज संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 या दिवशी भारताच्या चंद्रयान-3 मिशनअंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीत्या उतरवण्यात आलेल्या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हा भारताच्या यशातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे.
यामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश आणि दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा पहिला देश ठरला. आर्यभट्ट ते गगनयान: प्राचीन ज्ञानातून अनंत संधी अशी यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISROनं काल नवी दिल्लीत राष्ट्रीय अंतराळ परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेत मंत्रालयं, खाजगी भागधारक, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि तज्ञ सहभागी झाले होते.