January 22, 2026 3:03 PM | Rashtrapati Bhavan

printer

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातलं ऐतिहासिक अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून जनतेला पाहण्यासाठी खुलं

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातलं ऐतिहासिक अमृत उद्यान येत्या ३ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत हे उद्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुलं राहिल. हे उद्यान ४ मार्च रोजी होणाऱ्या होळीनिमित्त बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे