डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं

क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो चा पराभव केला. १८ पैकी १४ गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉरमॅट मध्ये पहिलं स्थान पटकावलं. पोलंडचा जान क्रिजस्टोफ दुडा दुसऱ्या स्थानावर असून माजी विश्वविजेता नॉवेचा मॅग्नस कार्लसन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा प्रज्ञानंद देखील या स्पर्धेत सहभागी असून तो फॅबियानो कारुआनासमवेत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.  या स्पर्धेचा ब्लिट्झ टप्पा आजपासून सुरू होणार आहे.