January 23, 2026 8:04 PM

printer

Ranji Trophy: सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल ड गटात हैदराबाद इथं सुरु झालेल्या, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी मुंबईचा पहिला डाव ५६० धावांवर संपला. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढं खेळताना शतकवीर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा करताना त्यानं १९ चौकार आणि ९ षटकार ठोकले. सुवेद पारकरनं ७५, तर अथर्व अंकोलेकरनं नाबाद ३५ धावा केल्या.
 
 
ब गटात महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात काल पुण्यात सुरु झालेल्या सामन्यात आज दुपारच्या जेवणासाठी खेळ थांबेपर्यंत महाराष्ट्रानं ३ गडी गमावून १३१ धावा केल्या होत्या.
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.