डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2025 7:05 PM | Ranji Cricket Trophy

printer

महाराष्ट्र रणजी संघात बीडच्या सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून निवड

बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र रणजी संघात बीडचा यष्टिरक्षक, फलंदाज आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून  निवड झाली आहे. सौरभच्या निवडीबद्दल अनेक स्तरातले मान्यवर आणि क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरचा अंकित बावणे महाराष्ट्राचं  कर्णधार पद भुषवणार आहे. महाराष्ट्राच्या संघात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, जलज सक्सेना, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, रणजीश गुरबाणी, प्रदीप दाढे, हितेश वाळुंज, मंदार भंडारी, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे यांचा समावेश आहे.