February 11, 2025 8:33 PM | Ranji Cricket

printer

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ उपांत्य फेरीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं आज हरयाणावर १५२ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात ३१५, तर दुसऱ्या डावात ३३९ धावा केल्या. दुसऱ्या डावात आज कर्णधार अजिंक्य रहाणेनं १०८ धावा केल्या. हरयाणानं पहिल्या डावात ३०१ धावा केल्या होत्या. मात्र त्यांचा दुसरा डाव २०१ धावात आटोपला.

 

नागपुरात झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात, विदर्भानं तामीळनाडूवर १९८ धावांनी मात केली. विदर्भानं पहिल्या डावात करुण नायरच्या शतकी खेळीच्या जोरावर ३५३, तर दुसऱ्या डावात यश राठोडच्या शतकामुळे २७२ धावांची मजला मारली. तामीळनाडूनं पहिल्या डावात २२५, तर दुसऱ्या डावात २०२ धावा केल्या.

 

राजकोट इथं झालेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात गुजरातनं सौराष्ट्रावर १ डाव आणि ९८ धावांनी विजय मिळवत उपांत्यफेरी गाठली. पहिल्या डावात सौराष्ट्रानं २१६ , तर गुजरातनं ५११ धावा केल्या होत्या. गुजरातच्या उर्विल पटेलनं १४० जयमित पटेलनं १०३ धावा केल्या होत्या. मनन हिंगराज यानं ८३ धावांचं योगदान दिलं. सौराष्ट्राचा दुसरा डाव आज १९७ धावांवर आटोपला. गुजराततर्फे प्रियजीतसिंग जडेजानं ४ गडी बाद केले.