रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कोलकाता इथं सुरु असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात हरयाणावर २९२ धावांची आघाडी घेतली.
मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या. तनुष कोटियनच्या ९७, आणि शम्स मुलानीच्या ९१ धावांचा त्यात मोलाचा वाटा होता. हरयाणाचा पहिला डाव आज ३०१ धावांवर संपला. कर्णधार अंकित कुमारनं १३६ धावा केल्या. या डावात मुंबईतर्फे शार्द्रुल ठाकूरनं ६ गडी बाद केले.
मुंबईनं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद २७८ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे ८८, तर शिवम दुबे ३० धावांवर खेळत होता. सुर्यकुमार यादवनं ७० धावा केल्या.