श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांना न्यायालयानं सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. २०२३ मध्ये ब्रिटनच्या खासगी दौऱ्यात सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली काल त्यांना अटक झाली होती.
याप्रकरणी त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. आपल्या पत्नीच्या पीएचडी पदवी प्रदान समारंभाला जाण्यासाठी लंडन दौऱ्यावर ५० हजार डॉलर खर्च केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.