विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली. ते रामटेक जवळच्या नवरगाव इथल्या प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी केल्यानंतर बोलत होते. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही ते म्हणाले. ‘रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर’ राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येईल तसच १५६ एकरात प्राचीन मूल्य असणारी ‘प्राचीन वारसा स्थळे मनसर’ संवर्धनाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही शेलार म्हणाले.
Site Admin | September 15, 2025 7:01 PM | Ramtek Filmcity
रामटेक इथं उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या ६० दिवसात जमीन हस्तांतरित
