डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा

दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशंसा केली आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मंत्री रामदास आठवले यांना आज नागपूरमध्ये गडकरी यांच्या हस्ते प्रदान केला गेला, त्यावेळी ते बोलत होते.

 

मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.