खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलं असात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत फारसा फायदा होणार नाही असं आठवले म्हणाले.
मुंबईत ४० टक्के मराठी मतदारांचा कौल हा महायुतीलाही मिळणार असून २० टक्के मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. येत्या ८ मार्च रोजी आरपीआयचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.